E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गोखले संस्थेचे सचिव देशमुख यांना अटक
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
नियमबाह्य पध्दतीने वळविला निधी
पुणे : गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या संस्थेतील एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याच्या आरोपावरून सर्व्हंट्स ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली.
याबाबत डॉ. विशाल भीमराव गायकवाड (वय ३९, रा. रामनगर, वारजे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. गायकवाड हे वर्ष २०२२ पासून गोखले राज्यशास्त्र संस्थेत संशोधन समन्वयक (रिसर्च को ऑर्डिनेटर) म्हणून काम पाहत होते. सध्या ते संस्थेत ‘ऑफिशिएटिंग डेप्युटी रजिस्ट्रार’ आहेत. गोखले राज्यशास्त्र ही संस्था सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या अधीन आहे. शासकीय अनुदान, विद्यार्थ्यांचे शुल्क, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीवर संस्थेचे कामकाज चालते.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार शैक्षणिक संस्थेतील निधी अन्य खात्यांमध्ये वळवणे नियमबाह्य आहे. मिलिंद देशमुख यांनी १३ डिसेंबर २०२२ रोजी संस्थेला एक पत्र दिले. नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडियाची जमीन ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली. संबंधित मागणी संस्थेतील कोणत्याही सदस्यांची परवानगी न घेता, तसेच ठराव न करता वळवण्यात आल्याचे डॉ. विशाल गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
सर्व्हंट्स ऑफ इंडियाच्या पत्रावर गोखले राज्यशास्त्र संस्थेचा शिक्का आहे. त्यानंतर गोखले राज्यशास्त्र संस्थेतील नियामक मंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ही रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी एक कोटी दोन लाख रुपये नागपूर जिल्हाधिकार्यांच्या खात्यावर, तसेच ४० लाख रुपये धनादेशाद्वारे सोसायटीच्या खात्यावर पाठवण्यात आले.
या रकमेचा वापर जुनी कागदपत्रे मिळवणे, मुद्रांक शुल्क, सल्लागार शुल्क, प्रशासकीय खर्च या कारणांसाठी दाखवण्यात आला आहे. या खर्चाचा तपशील संशयास्पद आहे. मिलिंद देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी संस्थेची फसवणूक करत स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Related
Articles
औषधांच्या किंमतवाढीचा रुग्णांना ताप!
11 Apr 2025
नजरकैदेत ठेवले; नमाज अदा करण्यापासूनही रोखले
12 Apr 2025
जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ चांगला उपक्रम : आशिष शेलार
12 Apr 2025
अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे जागतिक व्यापारात तीन टक्के घट
13 Apr 2025
शानदार शतकासह अभिषेक शर्माने मोडला राहुलचा विक्रम
14 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार